Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना: या योजनेची सुरुवात केंद्र सरकार बरे 9 मे 2015 रोजी करण्यात आली आहे. आज कालच्या जगामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचा काही भरोसा नाही, कोठेही कोणाचा मृत्यु होऊ शकतो. या कारणा मुळे केंद्र सरकार ने प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरु केली आहे.या योजना द्वारा कोणाच्याही आकस्मिक निधन झाल्यास सरकारकडून २ लाख रुपयांपर्यंतचे कव्हर मिळते. प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजने चा लाभ घेण्यासाठी व्यक्ती चे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 50 वर्ष असले पाहिजे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी अर्ज करू शकतात.

प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना मोदी सरकारने देशातील जनतेच्या हितासाठी सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून फक्त ४३६ रुपये वार्षिक प्रीमियम भरून २ लाख रुपयांची आयुष्यभर सुरक्षा मिळते, जे कोणत्याही कारणाने झालेल्या मृत्यूवर लागू होते,जसे की नॅचरल डेअथ ( natural death), अपघाती मृत्यू ( accident) इत्यादी. कोणत्याही व्यक्तीची मृत्यू कधीही होऊ शकते. केंद्र सरकारने या गोष्टी लक्षात येऊन ही योजना सुरू केली आहे.
आज ह्या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना च्या संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत, जसे की या योजनेचा लाभ काय आहे, या योजनेची पात्रता काय आहे, या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे व या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा या सर्वांची माहिती सविस्तरपणे आम्ही आर्टिकल मध्ये सांगणार आहोत तरी तुम्ही हे आर्टिकल काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा.
योजनेचे नाव | Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
योजना कधी सुरू झाली | 9 मे 2015 |
योजनेची लाभार्थी | भारतातील सर्व नागरिक |
योजनेचा उद्देश | पॉलिसी विमा प्रदान करणे |
आर्थिक मदत | दोन लाखापर्यंतचा पॉलिसी कवच |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
राज्य किंवा देश | भारत |
योजनेची वेबसाईट | Jivan Jyoti Bima Yojana |
Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना काय आहे ?
या योजनेची सुरुवात भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) आणि इतर खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका मार्फत सुरू केली जात आहे.Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजने अंतर्गत जर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराचा मृत्यू हा 55 वर्षा अगोदर झाला तर सरकार द्वारे त्याच्या नॉमिनीला 2 लाख रुपयांचे जीवन विमा प्रदान केला जातो.
या योजनेच्या अंतर्गत पॉलिसी प्लॅन घेण्यासाठी नागरिकांना कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 50 वर्षे असणे आवश्यक आहे.तसेच, या पॉलिसीची परिपक्वता (maturity) वय ५५ वर्षे आहे. प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना भारत सरकार ची एक महत्वपूर्ण योजना आहे,जी गरीब आणि वंचित लोकांना विम्याचे कवच प्रदान करते. तसेच त्यांच्या मुलांना चहा भविष्यासाठी व भविष्यामध्ये त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरू शकते. देशातील जे इच्छुक लाभार्थी या प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाट घेणार आहात. अशांना या योजने अंतर्गत अर्ज करणे आवश्यक आहे.
केंद्र सरकार द्वारे प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना चा प्रीमियम दरामध्ये 31 मे 2022 मध्ये सुधारणा केली गेली आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या प्रतिकूल दाव्यांच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दररोज 1 रुपये 25 पैसे प्रीमियम भरावा लागेल.त्यामुळे दर महिन्याची प्रीमियम रक्कम ₹३३० वरून वाढून ₹४३६ झाला आहे. या योजनेला 2015 मध्ये सुरुवात केली होती. मागच्या अकरा वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत प्रीमियम रेट मध्ये कोणतेही संशोधन केले नाही. 31 मार्च 2022 पर्यंत या योजनेअंतर्गत ६.४ कोटी ग्राहक सक्रिय होते.
Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजने चे लाभ
प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू करण्याचे अनेक लाभ आहेत.कुटुंबातील सदस्याच्या अचानक मृत्यूनंतर कुटुंबीयांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा कठीण परिस्थितीत सरकारकडून कुटुंबाला ₹२ लाखांची आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे त्यांना जगण्यासाठी थोडा आधार मिळू शकतो.
- या योजनेचा लाभ फक्त 18 वर्षे ते 50 वर्ष वयाच्या लोकांना उपलब्ध करून दिला जाईल.
- जर तुमचा मृत्यू 55 वर्ष वयाच्या कमी वयामध्ये होते तर तुमच्या कुटुंबाला या योजनेचा कव्हर दिला जाईल.
- या योजने अंतर्गत ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक सहायता दिली जाते. ज्यामुळे त्यांचे भविष्य चांगले जाईल.
- योजनेचा लाभ अशाच लोकांना दिला जाईल ज्यांचे बँक खाते आहे.
- या योजनेत अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत विमा दावा करता येत नाही.४५ दिवसांनंतर तुम्ही योजनेचा पूर्ण लाभ घेण्यास पात्र ठरता.
- त्या योजनेसाठी तुम्हाला दरवर्षी 31 मे च्या अगोदर तुम्हाला प्रीमियम भरावे लागणार आहे.
- जर तुम्ही 31 मे च्या अगोदर प्रीमियम नाही भरले तर तुम्हाला या योजनेमध्ये परत नोंदणी करावी लागेल. म्हणजे परत अर्ज करावा लागेल.
- ही योजना सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी ₹४३६ तुमच्या बँक खात्यातून डेबिट होईल.
Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजने ची पात्रता
तुम्ही पण प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी स्वतःचा अर्ज करणार आहात.जर तुम्हीही तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी असे इच्छित असाल, तर तुम्हाला पुढील पात्रता पूर्ण करावी लागेल:
- अर्जदाराला प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्जदाराचे वय हे 18 वर्षे ते पन्नास वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या माध्यमातून विमा पॉलिसी सर्व जातीतील लोकांना दिला जाईल.
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. विम्याचे फायदे मिळवण्यासाठी अर्जदाराने आपले आधार कार्ड सहभागी बँक खात्याशी जोडले पाहिजे.
- बँक खाते असणे बंधनकारक आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे वैध बँक खाते असणे आवश्यक आहे.
- वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. या टर्म पॉलिसीअंतर्गत विमाधारकाने दरवर्षी ₹४३६ प्रीमियम भरावा लागेल.
- प्रीमियमच्या वार्षिक रकमेची स्वीकृती द्यावी लागेल, म्हणजेच तुमच्या खात्यातून दरवर्षी ₹४३६ ऑटो-डेबिट करण्यास मान्यता द्यावी लागेल.
- अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत कोणताही विमा दावा स्वीकारला जाणार नाही (फक्त अपघाती मृत्यूच्या बाबतीत हा नियम लागू नाही).
Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजने अँप्लाय प्रोसेस
जर तुम्हाला प्रधान मंत्री जीवन ज्योती योजने साठी ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर खालील प्रमाणे तुम्ही करू शकता :
- तुम्हाला प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जन सुरक्षा च्या अधिकृत वेबसाईटवर जायला हवी.
- याच्यानंतर तुम्हाला होम पेजवर एक पर्याय दिसेल ज्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- याच्या नंतर तुमच्यासमोर तीन पर्याय उघडतील. त्यामध्ये तुम्हाला प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे.
- जिथे तुम्हाला एक अर्ज फॉर्म मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
- अर्ज फॉर्म वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व भाषांमध्ये फॉर्म उघडतील तिथे तुम्हाला तुमच्या भाषेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
- याच्यानंतर ना तुम्हाला फॉर्ममध्ये सांगितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- फॉर्ममध्ये सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक ऑफिस मध्ये जाऊन जमा करायचे आहे.
- या योजनेसाठी तुमच्या खात्यामध्ये पर्याप्त रक्कम असणे आवश्यक आहे सर असेल तरच या योजनेसाठी तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.
- तुमच्या अकाउंट मध्ये पैसे कट झाल्यानंतर तुमचा अर्ज हा या योजनेसाठी केला जाईल असे ग्राह्य धरू शकता.
- या योजनेला चालू ठेवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी तुमच्या खात्यामध्ये 436 कपावे लागतील.
- अशाप्रकारे तुम्ही तुमचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करू शकता.
Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे काही आवश्यक प्रश्न
- प्रधानमंत्री जीवन ज्योति योजनाचे फायदे/लाभ काय आहेत ?
- या प्रधानमंत्री जीवन ज्योति योजनेअंतर्गत दरवर्षी 436 रुपये प्रीमियम भरल्यास 2 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण दिले जाते.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसाठी प्रीमियम रक्कम किती आहे ?
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेच्या प्रीमियमची रक्कम प्रति वर्ष 436 रुपये आहे.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website
Beti Padhao Beti Bachao Yojana 2025 | बेटी पढाओ बेटी बचाओ योजना
Pradhanmantri Jal Jivan Mission Yojana 2025 | प्रधानमंत्री जल जीवन मिशन योजना