Pradhan Mantri Ujjwala gas Yojana |प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने ची सुरुवात ही 2016 मध्ये केली होती. Pradhanmantri Ujjwala gas Yojana| प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ही गरीब कुटूंबाला मोफत स्वयंपाक गॅस उपलब्ध करून देते. जेणे करून BPM कुटूंबाला या चा फायदा भेटेल.

Pradhanmantri Ujjwala gas Yojana| प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना म्हणजे काय?
देशात काही वर्षांपूर्वी गावातील लोक फक्त चुलीवर जेवण करत होते. ज्यामुळे महिलां आरोग्यावर विपरीत परिणाम होत असे . चूली आणि कोळशापासून पेटणाऱ्या सिगड्या मुळे अनेक महिला आजारी पडत होत्या. या समस्ये मुक्ती भेटण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना सुरू केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ची सुरुवात 1 मे 2016 रोजी करण्यात आली. ही योजना गरीब कुटुंबाला मोफत स्वयंपाक गॅस उपलब्ध करून देते. कारण ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील राहणाऱ्या बीपीएल कुटुंबाला या योजनेचा फायदा होईल.
उत्तर प्रदेशच्या बिलिया जिल्हा पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेत आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबाला मोफत गॅस कलेक्शन दिले जाते. एवढेच नाही तर पूर्ण वर्ष महिला एलपीजी गॅस चा वापर कराव्या म्हणून त्यांना सबसिडीवर गॅस सिलेंडर दिले जाते. त्याचबरोबर कनेक्शन घेतल्यानंतर 1600 रुपयांचे आर्थिक मदत पण दिली जाते
कारण गॅस कनेक्शन साठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करू शकतील गॅस शेगडी विकत घेण्यासाठी सरकार ईएमआय ची पण सुविधा देत आहे.आज आपण या लेख मधून जाणून घेणार आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने साठी कोण पात्र आहेत, अर्ज कसा भरायचा आणि याचा लाभ काय काय आहे.
Pradhanmantri Ujjwala gas Yojana| प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना उद्देश
महिलांची सुरक्षा तसेच सुरक्षित वातावरण बनण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करण्यात आली आहे.आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी इंधन म्हणून लाकडं, शेणाच्या गोवऱ्या यांचा वापर केला जातो. यामुळे निघणारा धूर हा आजारांचा मूळ असतो. गरीब कुटुंबाकडे गॅस सिलेंडर घेण्यासाठी पैसे नसतात.यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजने चा शुभारंभ केला. एवढेच नाही तर योजनेचा प्रचार करण्यासाठी आणि स्वच्छ इंधन नाने स्वयंपाक बनवण्यासाठी महिलांना प्रेरित सरकारने कोणतीही कसर सोडली नाही.सुरुवातीला सरकारने जाहिराती, गल्लीनाट्ये आणि पोस्टर्सच्या माध्यमातून महिलांना संदेश पोहोचवला. त्यानंतर आज अनेक महिला चुलीच्या धुरापासून मुक्त होऊन एलपीजी गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करत आहेत.
योजनेचे नाव | Pradhanmantri Ujjwala gas Yojana| प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना 2024-24 |
कधी सुरू झाली | 1 मे 2016 |
कोणी सुरू केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी |
कोणाच्या नियंत्रण खाली | केंद्र सरकार आणि पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय |
योजनेचा उद्देश | आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबांना मुफ्त मध्ये एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून स्वच्छ इंधन प्रधान करणे |
लाभार्थी | 18 वर्षे पेक्षा जास्त वयाच्या महिला |
आर्थिक मदत | 1600 रुपये |
कुठून चालू झाली | उत्तर प्रदेश राज्यातील बलिया गावा पासून |
योजनेची वेबसाईट | PM Ujjwala Gas Yojana |
Pradhanmantri Ujjwala gas Yojana| प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना मुख्य पॉईंट्स
- केंद्र सरकारने महिलांना लक्षात घेऊन प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना सुरू केली.
- योजनेच्या अंतर्गत मिळणारे 1600 रुपये थेट महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.
- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना केवळ अशा कुटुंबांसाठी आहे जे गरीब रेषेखालील (BPL ) येतात.
- पहिला केवळ पाच करोड कुटुंबांना या योजनेत शामिल केले गेले होते. पण संशोधन केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या वाढवली गेली आहे. आज पर्यंत देशात लगबग आठ करोड लोकांना या योजनेचा लाभ भेटला गेला आहे.
- गरीब कुटुंबाला सबसिडीवर सिलेंडर दिले जाते.
- एक वर्षात 14.2 किलोग्रॅम चे तीन सिलेंडर सरकार द्वारे मोफत दिले जाते.
- जर कोणी पहिल्यांदा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर आणि गॅस शेगडी विकत घेत असेल तर त्याला इ एम आय ची सुविधा दिली जाते.
- तसेच, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळाल्यानंतरही काही लोक अजूनही चुलींवर स्वयंपाक करतात. त्यामुळे त्यांना वेळोवेळी सरकारकडून समज देण्यात येते.
- पूर्वी स्वयंपाकासाठी लाकूड किंवा कोळशाचा वापर केला जात होता, ज्यामुळे धूर निर्माण होऊन आरोग्यावर गंभीर परिणाम होत असे आणि नैसर्गिक साधनांचा अव्यवस्थित उपसा केला जात होता. जंगलातील लाकडे तोडणे आणि कोळशापासून सिगडी पेटवणे यांसारखे कार्य केले जात होते, ज्यामुळे पर्यावरण प्रदूषण होत असे. परंतु प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू झाल्यानंतर यामध्ये लक्षणीय घट झाली आहे.
- धुरामुळे महिलांवर होणाऱ्या दुष्परिणामांपासूनही त्यांची मुक्तता झाली आहे.
- देशातील गरीब कुटुंबांतील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली आहे.
Pradhanmantri Ujjwala gas Yojana| प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने चे लाभार्थी
- देशातील सर्व महिला ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल अशा महिला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना साठी अर्ज भरू शकतात.
- महिलाही भारतातील निवासी असली पाहिजे.
- महिला पाशी बीपीएल कार्ड असणे. आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- बँक खाते हे आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे.
- जर या कुटुंबातील पहिलाच एक महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या महिलेला या योजनेचा लाभ भेटू शकणार नाही.
- अंत्योदय अन्न योजना अंतर्गत लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
Pradhanmantri Ujjwala gas Yojana| प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने ची पात्रता
- चहा बागायत कामगारांच्या जमातीतील लोक,
- मागासवर्गीय महिला,
- कलम ११ च्या यादीत समाविष्ट असलेल्या महिला,
- बीपीएल कार्ड धारक महिला,
- वनवासी कुटुंबे,
- अनुसूचित जाति व अनुसूचित जमातीतील महिला.
Pradhanmantri Ujjwala gas Yojana| प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने चे फायदे
- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत देशातील सर्व महिलांना श्री गॅस कनेक्शनप्राप्त करू शकतात.
- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत नवीन गॅस कनेक्शन वर पहिले गॅस रिफल ती मध्ये दिले जाईल.
- योजनेच्या अंतर्गत तुम्हाला गॅस सिलेंडर बरोबर गॅस शेगडी, पाईप, रेग्युलेटर आणि लाईटर इत्यादी वस्तूदिले जाईल.
- त्याचबरोबर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जर तुम्ही कनेक्शन तसेच ठेवला तर त्यावर तुम्हाला सीडीचा बिलात घेता येईल.
- या योजनेद्वारे व कनेक्शनच्या मदतीने तुमचा सामाजिक व आर्थिक विकास सुनिश्चित केला जाईल इत्यादी.
Pradhanmantri Ujjwala gas Yojana| प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने साठी लागणारे आवश्यकता कागदपत्रे
- अर्ज भरणाऱ्या महिलाचे आधार कार्ड
- राशन कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- सध्याचा मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
वरील सर्व कागदपत्रे पूर्ण करून तुम्ही या योजने साठी अर्ज भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
Pradhanmantri Ujjwala gas Yojana| प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेसाठी ऑनलाइन अप्लाय प्रोसेस
PM उज्जवला योजना 3.0 2025 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी खालीलप्रमाणे चरण आहेत:
- सर्वप्रथम तुम्हाला अर्ज भरण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन होम पेजवर जावे लागेल.
- होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला अप्लाय फ्रॉम न्यू प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना कनेक्शन( apply from new Pradhan Mantri Ujjwala gas Yojana connection) असा पर्याय भेटेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर एक नवीन पेज उघडलेले दिसेल
- या पेजवर तुम्हाला सर्वात वरती क्लिक हियर टू अप्लाय फॉर न्यू उज्वला कनेक्शन (click here to apply from new Ujjwala connection) पर्याया भेटेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पॉप ॲप ( pop app )उघडेल.
- आता इथे तुम्हाला तुमच्या आवडीची गॅस कंपनी( उदाहरणार्थ आपण इथे भारत गॅस घेऊ) आता हा विकल्प घेतल्यानंतर तुम्ही पुढे दिलेल्या अप्लाय न्यू ( apply new) या पर्यायाला क्लिक करा.
- आणि परत तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- आता इथे तुम्हाला “Type of Connection” मध्ये “Ujjwala 2.0 New Connection” चा पर्याय निवडून पुढील माहिती भरून “Proceed” च्या ऑप्शनवर क्लिक करावा लागेल.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्हा आणि क्षेत्रातील सर्व गॅस एजन्सींची यादी समोर येईल.
- आता इथे तुम्हाला ज्या गॅस एजन्सीकडून कनेक्शन घ्यायचं आहे, त्यावर क्लिक करून “Continue” च्या पर्यायावर क्लिक करावा लागेल. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर त्याचं एक नवीन पृष्ठ उघडेल
- आता इथे तुम्हाला आधार आधारित OTP सत्यापन करावा लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर त्याचं ऑनलाइन अर्जाचा फॉर्म उघडेल.
- आता तुम्हाला काळजीपूर्वक हा ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. त्यानंतर, तुम्हाला “Submit” च्या ऑप्शनवर क्लिक करावा लागेल.
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे तुम्हाला तुमची “Request ID” मिळेल, जी तुम्हाला काळजीपूर्वक नोट करुन ठेवावी लागेल. त्यानंतर, खाली “Click Here To Upload Documents” चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावा लागेल. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
- आता इथे तुम्हाला आवश्यक असलेले डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करावे लागतील. त्यानंतर, शेवटी “Submit” च्या ऑप्शनवर क्लिक करावा लागेल. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक रिसीप्ट मिळेल, ज्याला तुम्ही प्रिंट करून सुरक्षित ठेवावे लागेल.
आवश्यक प्रश्न
- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना एका घरात दोन महिलांना भेटू शकते का ?
- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ही एका घरात दोन महिन्यांना भेटू शकत नाही.
- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने चे उद्दिष्ट काय आहे ?
- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने चे उद्दिष्ट आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबांना मुक्त मध्ये एलपी कनेक्शन उपलब्ध करून स्वच्छ इंधन प्रधान करणे हा आहे.