Beti Padhao Beti Bachao Yojana 2025 | बेटी पढाओ बेटी बचाओ योजना : बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरुवात देशाचे माननीय श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्याद्वारे 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत हरियाणा या गावातून केली गेली होती. भारत सरकार द्वारे या योजनेचा सुरू करण्याचा उद्देश मुलींविषयी समाजात असणाऱ्या भेदभावाला कमी करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन वाढवणे व नकारात्मक दृष्टिकोन पूर्णपणे नष्ट करणे हा आहे. या योजनेमुळे मुलींचे भविष्य चांगले बनवणे व तसेच, मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध उपयुक्त योजना सुरू करून त्या प्रभावीपणे अंमलात आणणे हे देखील या योजनेचे लक्ष्य आहे. या योजनेबरोबरच सरकारने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आला आहे तरी तुम्ही त्या योजनांचा सुद्धा लाभ घेऊ शकता.

जर तुम्हाला अशा अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या guidesnceprovider.com चॅनेलवर जाऊन अनेक योजनांची माहिती घेऊन त्या योजनांचा लाभ घेऊ शकता.
या योजनेचा मुख्य हेतू शिक्षण,आर्थिक सुरक्षितता आणि मुलींविरुद्ध होणाऱ्या हानिकारक प्रथांचा अंत करणे हा आहे. आज या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ज्या योजनेची सविस्तर माहिती देणार आहोत. जसे की सरकारने या योजना चालू करण्यामागचा उद्देश काय आहे,आज पण या योजनेमुळे देशातील मुलींना काय लाभ होऊ शकतो, या योजनेची पात्रता काय आहे,या योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत व या योजनेचा अर्ज कसा करावा या सर्वांची माहिती आम्ही या आर्टिकल मध्ये देणार आहोत,तरी तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की काळजीपूर्वक वाचा.
Beti Padhao Beti Bachao Yojana 2025 | बेटी पढाओ बेटी बचाओ योजना काय आहे ?
योजनेचे नाव | Beti Padhao Beti Bachao Yojana 2025 | बेटी पढाओ बेटी बचाओ योजना |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकारने |
योजना कधी सुरू झाली | 22 जानेवारी 2015 |
योजनेचा उद्देश | मुलींविषयी समाजात असणाऱ्या भेदभावाला कमी करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन वाढवणे व नकारात्मक दृष्टिकोन पूर्णपणे नष्ट करणे हा आहे |
योजनेचे लाभार्थी | भारतातील सर्व मुली |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
आर्थिक मदत | मुलींसाठी अनेक त्यांच्या उज्वल भविष्यासाठी योजना सुरू करणे |
राज्य किंवा देश | भारत |
योजनेची वेबसाईट | Beti Padhao Beti Bachao |
वर्ष 2015 मध्ये भारत सरकारने लैंगिक भेदभावाला घालण्यासाठी आणि महिलांच्या सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजना सुरू केली. या योजनेच्या सुरुवातीला 100 करोड रुपयांच्या निधीसह सुरू करण्यात आले होते. या योजना सुरू करण्या मागील मुख्य कारण म्हणजे समाजात मुलींना मुलांइतके महत्त्व दिले जात नव्हते. अनेक वेळा मुलींचा गर्भातच अंत केला जात असे. त्यामुळे २०११ च्या जनगणने नुसार भारतातील लिंगानुपात (९१८/१०००) होता, जो आतापर्यंतचा सर्वात कमी होता. ह्यामुळे सरकारला एक विशेष मोहीम राबवावी लागली, जिचे नाव ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ आहे.
Beti Padhao Beti Bachao Yojana 2025 | बेटी पढाओ बेटी बचाओ योजने चे लाभ
- भविष्यातील आर्थिक सुरक्षेतेसाठी मुलींच्या नावावर खाते उघडण्याची तरतूद.
- हे खाते आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे आणि पूर्णपणे करमुक्त आहे.
- स्पर्धात्मक व्याज दर प्रदान करते आणि मुलीचे १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच पैसे काढण्याची परवानगी देते.
- पालक किंवा संरक्षकांना मुलींसाठी सोपी बचत सुविधा उपलब्ध करून देते.
- या योजनेच्या तर्फे सुकन्या समृद्धी खाते ( एस एस ए ) ही बचत योजना सुरू करण्यात आली आहे.
- मुली आणि महिलांशी संबंधित समस्यांवर जागरूकता निर्माण करणे.
- महिलांसाठी कल्याणकारी सेवांच्या उपलब्धतेत सुधारणा करणे..
- राज्यांमध्ये आणि भागांमध्ये बाल लिंग अनुपात (CSR) घटला आहे, त्या ठिकाणी सुधारणा करणे.
- सुकन्या समृद्धी योजना खात्यांवर दरवर्षी आकर्षक ८.१% व्याजदर प्रदान करते.
- दरवर्षी १.५० लाख रुपये पर्यंत जमा करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
- महिलांसाठी चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे.
बेटी बचाव, बेटी पढाव योजनेअंतर्गत आर्थिक मदत:
या योजनेअंतर्गत सरकार थेट आर्थिक मदत करत नाही, परंतु विविध उपाययोजनांद्वारे मुलींच्या शिक्षणाला आणि सुरक्षेला प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना (SSA) महत्त्वाची आहे, जी मुलींसाठी दीर्घकालीन बचतीसाठी उपयुक्त आहे.
आर्थिक मदतीसंबंधी मुख्य वैशिष्ट्ये:
- सुकन्या समृद्धी खाते (SSA): दरवर्षी जास्तीत जास्त ₹1.50 लाख जमा करता येतात, सरकारकडून यावर आकर्षक 8.1% पर्यंत व्याजदर दिला जातो, खाते मुलीच्या 18 वर्षांनंतरच पैसे काढण्यासाठी उपलब्ध होते, आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते.
- राज्य आणि जिल्हास्तरीय निधी : सरकारने सुरुवातीला ₹100 कोटी या योजनेसाठी मंजूर केले होते, विशेषत: लिंगानुपात कमी असलेल्या राज्यांमध्ये निधी अधिक दिला जातो, शाळांमध्ये मुलींसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणासाठी मदत, शौचालये आणि आरोग्यसेवा सुधारणा यासाठी निधी वापरण्यात येतो
Beti Padhao Beti Bachao Yojana 2025 | बेटी पढाओ बेटी बचाओ योजने ची पात्रता
- ही योजना भारताच्या सर्व राज्यांमधील आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मुलींसाठी लागू आहे.
- विशेषतः लिंगानुपात कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये (जसे की हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार इ.) अधिक लक्ष दिले जाते.
- या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मुलगी ही एक वर्ष ते दहा वर्षापर्यंत असली पाहिजे. हीच या योजनेसाठी पात्र ठरू शकते.
- बेटी बचाव बेटी पढाव योजनेसाठी आई-वडिलांना त्यांच्या मुलीचे बँक अकाउंट उघडायला हवे.
- या योजनेमध्ये जेवढा पण खर्च होईल तो सर्व केंद्र सरकार द्वारा दिले जाईल.
Beti Padhao Beti Bachao Yojana 2025 | बेटी पढाओ बेटी बचाओ योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- वार्षिक उत्पन्न
- बँक खाते पासबुक
- सुरू असलेला मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो ( आई-वडिलांचा व त्या मुलीचा)
Beti Padhao Beti Bachao Yojana 2025 | बेटी पढाओ बेटी बचाओ योजने ची अँप्लाय प्रोसेस
ऑनलाइन प्रोसेस
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पहिला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला विजिट करावे लागेल.
- जसे तुम्ही या वेबसाईटवर जाल तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला वुमन इम्पॉवरमेंट स्कीम या पर्यायाला क्लिक करायचे आहे.
- याच्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ हा पर्याय दिसेल. या पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि पुढे जायचे आहे.
- या पर्यायाला तुम्ही जसे क्लिक कराल तसे तुमच्या समोर अर्ज उघडेल. या अर्जावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि या अर्जावर सांगितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. आज भरून झाल्यावर तुम्हाला या योजनेसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे यांची फोटो काढून त्याला स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
- हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सबमिट वर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
ऑफलाइन प्रोसेस
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेकरिता तुम्हाला सर्वप्रथम जवळच्या शासकीय बँक शाखेत जावे लागेल. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येही जाऊ शकता.
- त्यानंतर तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे अर्जपत्र घ्यावे लागेल. त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरावी.
- अर्जपत्रामध्ये सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील.
- जेव्हा तुम्ही ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण कराल, तेव्हा तुम्हाला अर्ज बँक अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागेल.
- याप्रकारे तुमचा अर्ज बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी नोंदवला जाईल.
Beti Padhao Beti Bachao Yojana 2025 | बेटी पढाओ बेटी बचाओ योजने चे काही आवश्यक प्रश्न
- बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना काय आहे ?
- ही केंद्र सरकारची योजना आहे, जी मुलींच्या जन्मदरात सुधारणा, त्यांचे शिक्षण आणि संपूर्ण विकास सुनिश्चित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
- ही योजना कधी आणि कोणी सुरू केली ?
- ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या पानीपत येथे सुरू केली.
- योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ?
- मुलींच्या जन्मदरात वाढ करणेशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणेलिंग समानता प्रोत्साहित करणेमहिलांच्या सशक्तीकरणाला चालना देणे
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website
Mulina Mofat Shikshan Yojana 2025| मोफत शिक्षण योजना | मुलींना भेटणार उच्च शिक्षणाचा मोफत लाभ