CBSE Udaan Yojana 2025 | सी बी एस इ उडान योजना : आजच्या काळात मुलींना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्यासाठी सरकार अश्या खूप योजना सुरु करत आहे. या योजने च्या मदतीने देशाहतील मुलींच्या विकासासाठी खूप लाभ होत आहे. अश्याच प्रकारे मुलींच्या विकासासाठी भारत सरकारने मुलींसाठी एक CBSE उडाण योजना सुरु केली आहे. ही योजना एक स्कॉलरशिप योजना आहे, जेणे करून मुलींचे भविष्य सुधारेल व त्यांना चांगले शिक्षण मिळेल यासाठी सुरू करण्यात आली आहे.

आज काल बघायला गेले तर शाळेमध्ये मुलांपेक्षा मुली या शिक्षणाच्या बाबतीत पुढे जात आहे. मुली या आजच्या काळामध्ये मुलांच्या पेक्षा कमी नाही आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांपेक्षा दोन पाऊल पुढे जात आहे. जर देशावर काही कारणांनी संकट आले तर मुली देखील देशाचे नाव उज्वल करण्यासाठी मागे पुढे राहणार नाहीत. जर मुलींना संधी दिली गेली तर त्या भविष्या मध्ये मागे हटणार नाहीत . मुलीनच्या याच शिक्षणावरील प्रेम पाहून भारत सरकारने ही CBSE उडान योजना सुरू केली आहे .
या CBSE उडान योजने च्या माध्यमातून इंजिनियरिंग प्रवेशा मध्ये मुलींची वाढ झाली आहे आणि त्या पण इंजिनियरिंग ला प्रवेश घेऊन इंजिनियर बनत आहेत . या CBSE उडान योजना चालू करण्याचा मुख्या उद्धेश मुलीनं शिकून त्यानचे भविष्य सुधारायचे आहे व त्यांना स्वताच्या पायावर उभे करायच आहे .
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजने विषयी सर्व माहिती माहीत आसने आवश्यक आहे . आम्ही ही माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये संगणार आहोत तर तुम्ही ही आर्टिकल शेवट पर्यन नक्की वाचा,या मध्ये आम्ही तुम्हाला या योजने विषयी सविस्तर माहिती संगणार आहोत ,जसे की सीबीएसई उडान योजना काय आहे ,या योजनेचा लाभ काय आहे ,या योजनेची पात्रता की आहे ,या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात ,या योजनेचा अर्ज कसा भरावा या सर्वांची माहिती आज या आर्टिकल मधी तुम्हाला सांगणार आहोत ,तर तुम्ही हे आर्टिकल शेवट पर्यनत नक्की वाचा .
योजनेचे नाव | CBSE Udaan Yojana 2025 | सी बी एस इ उडान योजना |
योजना कोणी सुरू केली | मानव संसाधन आणि विकास मंत्रालय व सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन |
योजना कधी सुरू झाली | 2018 |
योजनेचे लाभार्थी | भारतातील विद्यार्थी विद्यार्थिनी |
योजनेचा उद्देश | मुलीनं शिकून त्यानचे भविष्य सुधारायचे आहे व त्यांना स्वताच्या पायावर उभे करायच आहे . |
आर्थिक मदत | वर्चुअल क्लासेस व ऑनलाइन क्लासेस च्या मदतीने इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा ची तयारी करून घेणे व शिक्षणासाठी लागणारी आवश्यक साहित्य जसे की टॅब आणि वाचन साहित्य दिले जाईल. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
राज्य किंवा देश | भारत |
योजनेची वेबसाईट | CBSE Udaan Yojana |
CBSE Udaan Yojana 2025 | सी बी एस इ उडान योजना काय आहे ?
CBSE Udaan Yojana 2025 | सी बी एस इ उडान योजना या योजने अंतर्गत मुलींना विनामूल्य शिक्षण प्रदान केले जाते, त्यामध्ये त्यांना इंजीनियरिंग मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना तयारी करून दिली जाईल आणि उच्च माध्यमिक स्तरावर त्यांना सायन्स व मॅथ्स या वर्गाचे शिक्षण दिले जाईल. या विनामूल्य शिक्षणां बरोबरच मुलींना स्टडी मटेरियल पण दिले जाईल. सर्व पात्र विद्यार्थिनींना टॅब आणि वाचन साहित्य दिले जाईल, ज्यामुळे त्यांना अभ्यास करण्यात सोपे जाईल व खूप मोठी मदत होईल.
त्याचबरोबर त्यांना ऑनलाइन क्लास व व्हर्च्युअल क्लास देखील घेतले जाईल जेणेकरून त्यांना जास्त ज्ञान घेता येईल. भारत सरकारने विकास मंत्रालय व मानव संसाधन विभागाच्या सहाय्याने सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सी बी एस ई (CBSE) यांच्या साह्याने या योजनेची सुरुवात केली. या योजनेमध्ये अकरावी पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनीयरिंग प्रवेश परीक्षा साठी विनामूल्य शिक्षण दिले जाईल, या शिक्षणामुळे त्यांना इंजिनिअरिंग प्रवेशासाठी खूप मदत होईल.
या सीबीएसई उडान योजना मुळे विद्यार्थ्यांना खूप लाभ मिळेल आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी इंजिनियरिंग करण्यासाठी इच्छुक आहेत आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असल्यामुळे ते इंजीनियरिंग प्रवेश घेण्यासाठी माझी हटत आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप फायदेशीर होणार आहे.
CBSE Udaan Yojana 2025 | सी बी एस इ उडान योजना च्या मदतीने विद्यार्थी प्रवेश परीक्षा करून एक चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतात. असे खूप सारे सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रवेश परीक्षा मध्ये चांगल्या अंकाने पास झाल्यामुळे कमी पैशात प्रवेश देत आहेत. भारतातील मुली या योजनेचा फायदा घेऊन या योजनेच्या मदतीने खूप पुढे जाऊ शकते.
सीबीएससी उडान योजनेच्या मदतीने सरकार 60 वेगवेगळ्या भागांमध्ये ऑनलाइन व वर्चुअल क्लासेस सुरू करत आहे या योजनेत सहभागी होऊन पात्र विद्यार्थिनी शिक्षण घेऊ शकतात. यामध्ये केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर प्रॅक्टिकल ज्ञान देखील दिले जाईल, जेणेकरून त्या विविध टूल्स आणि तंत्रज्ञान समजून घेऊ शकतील.ही योजना मुलींना अभ्यासासोबतच तांत्रिक कौशल्ये विकसित करण्याची संधी देईल, ज्यामुळे त्या भविष्यात सक्षम अभियंता बनू शकतील.
CBSE Udaan Yojana 2025 | सी बी एस इ उडान योजने चे लाभ
- अर्जदारांना ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून मोफत मध्ये अभ्यासासाठी लागणारी सर्व साहित्य या योजनेच्या माध्यमातून प्रदान केले जाते.त्यांना ट्युटोरियल्स, व्हिडिओ आणि अध्ययन संसाधने मिळतात.
- सीबीएससी उडाण योजने अंतर्गत ऑनलाइन क्लास घेतले जातील.
- ऑनलाइन क्लासच्या मदतीने विद्यार्थी इंजीनियरिंग प्रवेश परीक्षे बरोबर च बारावी बोर्डाची परीक्षेची तयारी सुद्धा करू शकते.
- आज पण आपण पाहत आहोत कि इंजिनियरिंग क्षेत्रा मध्ये अजून पण मुलींची संख्या ही कमी आहे. म्हणून ही योजना सुरु केलेली आहे, जेणे करून या योजने च्या सह्याने इंजिरीयरींग कॉलेज मध्ये विध्यार्थांची संख्या वाढेल.
- सीबीएससी उडाण योजना इंजिनियरिंग कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यारे विध्यार्थ्यांना खूप उत्तम संधी भेटेल.
- या योजनेच्या मद्दतीने आवडत्या इंजिनियरिंग कॉलेज मध्ये विध्यार्थी प्रवेश घेऊ शकता.
- 60 वेगवेगळ्या शिक्षा केंद्रांच्या मदतीने शिक्षण दिले जाईल आणि टॅब्लेटचे वितरण केले जाईल.
- सरकार द्वारे या CBSE Udaan Yojana 2025 | सी बी एस इ उडान योजने च्या माध्यतून व्हर्चूअल क्लास साठी टॅब आणि स्टडी मॅट्रियल उपलब्ध करून दिले जाईल.
CBSE Udaan Yojana 2025 | सी बी एस इ उडान योजने ची पात्रता
- विद्यार्थी हे अकरावी किंवा बारावी मध्ये असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांच्या अकरावी वर्गामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स सब्जेक्ट असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याला दहावी मध्ये किमान 70 टक्के किंवा 8 सी जी पी ए (CGPA) आणि सायन्स आणि मॅथ्स मध्ये 80 टक्के मार्क किंवा 9 सी जी पी ए (CGPA) असले पाहिजे.
- विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थी हा नवोदय विद्यालय, केंद्र विद्यालय, सीबीएससी एफिलिएटेड अशासकीय स्कूल, मान्यता प्राप्त सरकारी स्कूल या विद्यालया मधून शिकलेला असावा .
CBSE Udaan Yojana 2025 | सी बी एस इ उडान योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- 10 वी आणि 11 वी ची गुणपत्रिका
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- पासपोर्ट साइज फोटो
CBSE Udaan Yojana 2025 | सी बी एस इ उडान योजने ची अँप्लाय प्रोसेस
- सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या :https://www.cbse.gov.inhttps://www.cbse.nic.inhttps://cbseacademic.nic.in
- सीबीएसई वेबसाइटवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- सीबीएसई उड़ान योजनेच्या पेजवर जा.
- अर्ज फॉर्म भरा:फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- अर्ज सबमिट करा:सबमिट बटणावर क्लिक केल्यावर नोंदणी क्रमांक (Registration Number) निर्माण होईल.हा नोंदणी क्रमांक अर्जदाराच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवला जाईल.
- अर्जदाराची सही, नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख विचारली जाईल.ही माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरा आणि सबमिट करा.
- अर्ज डाउनलोड करा आणि त्याची झेरॉक्स प्रत काढा.भविष्यात गरज भासल्यास ती सुरक्षित ठेवा.
CBSE Udaan Yojana 2025 | सी बी एस इ उडान योजनेचे काही आवश्यक प्रश्न
- उड़ान योजना म्हणजे काय आणि तिचा मुख्य उद्देश काय आहे ?
- उड़ान योजना ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे सुरू केलेली एक योजना आहे, जी विशेषतः मुलींसाठी आहे. तिचा मुख्य उद्देश विज्ञान आणि गणित विषयांमध्ये मुलींची संख्या वाढवणे आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे आहे.
- उड़ान योजनेचा लाभ कोणत्या विद्यार्थिनींना मिळतो ?
- ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिक दृष्ट्या मागास गटातील विद्यार्थिनींसाठी आहे. ज्या विद्यार्थिनी CBSE-संबंधित शाळांमध्ये शिकत आहेत आणि जेईई (JEE) परीक्षेसाठी तयारी करू इच्छितात, त्यांना याचा लाभ मिळतो.