Lakhpati Didi Yojana 2025 | लखपती दीदी योजना : लखपती दीदी योजनेची सुरुवात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी या च्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट 2023 रोजी सुरू करण्यात आली. लखपती दीदी योजना महाराष्ट्र चा मुख्य उद्देश देशातील महिलांना लखपती बनवणे हा आहे. या योजनेअंतर्गत देशातील तीन करोड पेक्षा जास्त महिला ना लखपती दीदी बनवले जाते.

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांनी 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लखपती दीदी योजना चा शुभारंभ केला आणि देशातील अनेक राज्य सरकार द्वारे योजनेला पूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी पाच लाख रुपयांपर्यंत लोन शून्य व्याजदरात दिले जाते.
लखपती दीदी योजने अंतर्गत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांनी अलीकडेच महाराष्ट्रातील जळगाव येथे 11 लाख लखपती दीदी यांना सन्मानित केले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी कर्ज त्याच बरोबर महिलांना प्रशिक्षण प्रधान केले जाते ज्यामुळे महिला आपला स्वतःचा व्यापार सुरू करू शकतील अनेक आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनू शकतील.
लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनिंग नियोजित केले जाते. या मास्टर ट्रेनिंग उद्यम संवर्धन, व्यवसाय व्यवस्थापन, पशुधन विकास, शेती, फलोत्पादन, मत्स्यपालन, मूल्य साखळी इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये किमान ५ वर्षांहून अधिक अनुभव असतो.
लखपती दीदी योजने साठी अर्ज प्रक्रिया केंद्र सरकार द्वारा सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहात. तर हे आर्टिकल शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला लखपती दीदी योजना महाराष्ट्र ची पूर्ण माहिती सविस्तरपणे सांगितली आहे.जसे की, या योजनेसाठी अर्ज कसा करावा, या योजनेसाठी काय पात्रता ठरेल, या योजनेचे लाभ काय आहे व या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे सर्वांची माहिती या लेख मध्ये सांगितली गेली आहे तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेणार आहात. तर हे आर्टिकल तुम्ही नक्की वाचा
योजनेचे नाव | Lakhpati Didi Yojana 2025 | लखपती दीदी योजना |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
योजना कधी सुरू झाली | 15 ऑगस्ट 2023 |
योजनेचे लाभार्थी | देशातील सर्व महिला |
योजनेचा उद्देश | देशातील महिलांना लखपती दीदी बनवणे व महिलांना आत्मनिर्भर बनवणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
आर्थिक मदत | शून्य व्याजदरावर पाच लाख रुपयांचे कर्ज |
राज्य किंवा देश | भारत |
योजनेची वेबसाईट | Lakhpati Didi Yojana Maharashtra |
Lakhpati Didi Yojana 2025 | लखपती दीदी योजना काय आहे ?
लखपती दीदी योजना केंद्र सरकार द्वारा सुरू केली गेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेची घोषणा देशा चे माननीय श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्याद्वारे 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरू करण्यात आले होते. ग्रामीण विकास मंत्रालय द्वारे तीन करोड पेक्षा जास्त देशातील महिलांना लखपती बनवण्यासाठी सहकार्य करण्यासाठी एक विस्तृत कार्यक्रम सुरू केला आहे.
लखपती दीदी योजना कार्यक्रम चा उद्देश लखपती दीदी यांना वर्षाला कमीत कमी १ लाख रुपयांचे स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी सहकार्य करणे हा आहे. महिलांना लखपती बनवण्यासाठी त्यांना पाच सूत्री सहकार्य दिले जाईल.ज्यामध्ये प्रत्येक दीदीला किमान तीन ते चार प्रकारच्या उपजीविका उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम केले जाईल. विशेषतः शेतीबरोबरच शेतीबाह्य उपक्रमही स्वीकारण्यास प्रवृत्त केले जाईल.
याचा उद्देश प्रत्येक दीदीला उद्योजिका किंवा इंटरप्रेन्योर बनवणे आहे. याशिवाय, महिलांना विविध प्रकारच्या आर्थिक सहाय्य सुविधा दिल्या जातील, जसे की बँक लिंकेज आणि बँक कर्जावर सवलत. या माध्यमातून डिजिटल आणि आर्थिक समावेशनावर विशेष भर दिला जाईल.
लखपती दीदी योजना अंतर्गत महिलाद्वारे बनवलेल्या उत्पादनांना ग्लोबल व्हॅल्यू चेनशी जोडण्यास आणि देश-विदेशातील बाजारांमध्ये पोहोचवण्यासाठी सहकार्य दिलं जातं.त्यासोबतच, तंत्रज्ञान आणि आर्थिक संसाधने गोळा करण्यासाठी लखपती दीदींना २० पेक्षा अधिक मंत्रालये आणि संस्थांनी सुरु केलेल्या योजना जोडल्या जातील.लखपती दीदी योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना उपजीविका उपक्रमांसाठी नियमित प्रशिक्षण दिलं जाईल, ज्यात कम्युनिटी रिसोर्स पर्सन्स आणि २० पेक्षा अधिक भागीदार ना-सरकारी संस्थांचा सहयोग मिळेल.
याशिवाय, दीदींना दीनदयाल उपाध्याय अंतोदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनद्वारे सेल्फ हेल्प ग्रुप (SHG) म्हणजेच दीदींच्या उत्पन्नात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करणारी अनेक योजना राबवली जातील. यामध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश केला जाईल, ज्यामुळे दीदींना लखपती बनण्यात मदत होईल.
दीदींच्या उत्पादन गटांना मजबूत करण्यासाठी PG, PE, किंवा FPO, रिवॉल्विंग फंड, सामुदायिक गुंतवणूक फंड, महिला उद्यम एक्सिलिरेशन फंड, बँक लिंकेज या स्वरूपात दीदींना आर्थिक सहाय्य दिलं जाईल. याशिवाय, शेती किंवा संबंधित क्षेत्रातील उपजीविका वाढवण्यासाठी कार्यक्रम राबवले जातील, जसे की पशुधन वाढवणे, जनवली उत्पादनात सहकार्य, आणि अनेक गैर-शेती उपजीविका कार्यक्रम, ज्यामध्ये स्टार्टअप विलेज इंटरप्रेन्योर प्रोग्राम, वन स्टॉप फैसिलिटी इत्यादींचा समावेश असेल.
लखपती दीदी योजना अंतर्गत दीदींना स्वयं सहायता समूहाद्वारे आर्थिक सहाय्य दिलं जातं, ज्यामध्ये २० हजार रुपये ते ३० हजार रुपयेपर्यंत रिवोल्विंग फंड (RF), २.५ लाख रुपये पर्यंत सामुदायिक गुंतवणूक फंड (CIF), बिनसुरक्षा २० लाख रुपये पर्यंत बँक कर्ज आणि बँक कर्जाच्या शीघ्र परतफेडीवर व्याजामध्ये सवलत दिली जाते. याशिवाय, ५ लाख रुपयांच्या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी सहाय्य देखील उपलब्ध करून दिलं जातं.
Lakhpati Didi Yojana 2025 | लखपती दीदी योजने चे लाभ
- केंद्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू केली आहे.
- या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना एक ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. ज्यामुळे त्या महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
- आत्तापर्यंत 1 करोड पेक्षा जास्त महिला लखपती दीदी बदली आहे.
- 1 फेब्रुवारी 2025 रोजी बजट भाषणात केंद्र सरकारने 3 करोड महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष ठेवले आहे.
- महिलांना वित्तीयदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध वित्तीय साक्षरता कार्यक्रम आयोजित केले जातात
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
- लखपती दीदी योजने अंतर्गत लहान कर्जासाठी महिलांना मायक्रो क्रेडिट सुविधा दिली जाते.
- या योजनेचा उद्देश महिलांना डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म, जसे की मोबाईल वॉलेट, या उपाय करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.
- लखपती दीदी योजनेमध्ये खूप सारे प्रशिक्षण कार्यक्रम पण समाविष्ट आहे.
Lakhpati Didi Yojana 2025 | लखपती दीदी योजने ची पात्रता
- अर्जदार हा भारतातील स्थायी निवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 50 वर्षा असले पाहिजे.
- महिलांना लखपती दीदी योजना आणि अन्य संबंधित कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी स्वयं सहायता समूह (SHG) से जुडणे अनिवार्य आहे. स्वयं सहायता समूह महिलांना आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सशक्त बनवण्यास मदत करतो, ज्यामुळे त्यांना सामूहिक पातळीवर विविध संसाधनांमध्ये प्रवेश मिळतो आणि त्यांचा सामूहिक विकास होतो.
Lakhpati Didi Yojana 2025 | लखपती दीदी योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- वार्षिक उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- पॅन कार्ड
- ई-मेल आयडी
- सध्याचा सुरू असलेला मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते
Lakhpati Didi Yojana 2025 | लखपती दीदी योजने ची अँप्लाय प्रोसेस
- सर्वप्रथम तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करावे लागेल.
- अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीन समोर होम पेज उघडे तेथे तुम्हाला दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- पॉर्न ओपन झाल्यानंतर तेथे विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे.
- याच्यानंतर तुम्हाला योजना साठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे.
- नंतर सबमिट करायला क्लिक करायचे आहे
- सबमिट पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तिथे पावती दिली जाईल.
- त्या पावतीला तुम्हाला प्रिंट करून तुमच्याकडे साभाळून ठेवायचं आहे.
- या प्रकारे तुम्ही तुमचा अडचण लखपती दीदी योजना साठी घर बसला ऑनलाइन करू शकता.
Lakhpati Didi Yojana 2025 | लखपती दीदी योजने चे काही आवश्यक प्रश्न
- लखपती दीदी योजना 2025 मध्ये काय नवीन आहे ?
- लखपती दीदी योजना 2025 मध्ये महिलांना अधिक सशक्त आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी विविध नवीन उपक्रम आणि योजनांचा समावेश केला जाईल. यामध्ये नवीन प्रशिक्षण कार्यक्रम, वित्तीय सहकार्य, तंत्रज्ञानाचा वापर आणि महिला उद्यमियोंला प्रोत्साहन दिले जाईल.
- लखपती दीदी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ?
- योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांची वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपये करण्यास मदत करणे आहे. महिलांना शेती आणि गैर-शेती क्षेत्रातील उपजीविका साधनांचा वापर करण्यास सक्षम करण्यात येईल.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website
Pradhanmantri Jal Jivan Mission Yojana 2025 | प्रधानमंत्री जल जीवन मिशन योजना