, , , ,

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजना | महाराष्ट्र सरकार कडून मिळणार 50 हजार रुपये

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजना

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र सरकार द्वारा 1 एप्रिल 2016 ला माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली होती. या योजने अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी करणाऱ्या आई-वडिलांच्या बँक खात्यात 50 हजार रुपयाची रक्कम मुलीच्या नावावर जमा केली जाते. जर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आई – वडील कुटुंब नियोजन स्वीकारतात,तर दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी 25 हजार – 25 हजार रुपये बँकेत जमा केले जातील.

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजना
Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 in Marathi | माझी कन्या भाग्यश्री योजना

तुम्हाला माहिती आहे का की मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत पोहोचवण्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना राबवण्यात येत आहे. आत्ताच महाराष्ट्र सरकार द्वारा महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2025 पण सुरू करण्यात आली आहे. ज्याच्या अंतर्गत मुलीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सरकारद्वारे त्या मुलींना आर्थिक सहाय्यता रक्कम प्रदान केली जाते.

आज या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजना 2025 विषयी सर्व माहिती देणार आहोत. इथे आम्ही तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे ?, या योजनेचे लाभ काय आहेत?, या योजनेची पात्रता, या योजने चा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या सर्वांची माहिती तुम्हाला सविस्तरपणे या आर्टिकल मध्ये सांगितली जाणार आहे. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेणार असाल व या योजनेची माहिती तुम्हाला भेटत नाही आहे तर हे आर्टिकल तुमच्यासाठी आवश्यक आहे. तरी तुम्ही हे आर्टिकल काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की वाचा.

योजनेचे नावMazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजना
योजना कोणी सुरू केली महाराष्ट्र सरकार
योजना कधी सुरू झाली 1 एप्रिल 2016
योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कन्या
योजनेचा उद्देश मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद
अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन
आर्थिक मदत 50 हजार रुपयांची आर्थिक मदत
राज्य किंवा देश महाराष्ट्र
योजनेची वेबसाईट Mazi Kanya Bhagyashree Yojana

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे ?

केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी बेटी पढाओ ‘ ही योजना फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश हा होता की ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींची संख्या कमी आहे त्या जिल्ह्या मध्ये ही योजना लागू करण्यात यावी.पहिला ही योजना सर्व भारत देशात प्रत्येक जिल्ह्या साठी निवडली जात होती.त्यानंतर ‘सुकन्या योजना’च्या लाभांना कायम ठेवत ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’मध्ये सुधारणा करण्यात आली आणि ही सुधारित योजना १ ऑगस्ट २०१७ पासून सुरू करण्यात आली.

महाराष्ट्र सरकार ने मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्या सोबतच त्यांच्या आरोग्यात सुधार करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना एक एप्रिल 2016 रोजी महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जे कुटुंब गरीब रेषेखालील (APL) येतात आणि ज्यांना दोन मुली आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. तसेच अशा कुटुंबांना काही सवलती मिळू शकतात. ज्यांचा जन्म गरीब रेषेखालील कुटुंबात झाला आहे.

१ एप्रिल २०१६ रोजी सुरू झालेल्या या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने १ ऑगस्ट २०१७ पासून सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुधारित योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न ७.५० लाख रुपयांपर्यंत असलेल्या कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे आणि ही योजना समाजातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत ज्या कुटुंबांनी एक मुलीला जन्म दिला आहे आणि लगेच एका वर्षाच्या आत कुटुंबाचे नियोजन केले आहे, त्यांच्या मुलीच्या नावावर सरकार द्वारे 50 हजार रुपयांची रक्कम बँकेमध्ये जमा केली जाणार आहे.

त्याचप्रमाणे, दुसरी मुलगी जन्मल्यानंतर त्वरित कुटुंब नियोजन केलेल्या कुटुंबांना, परिवार नियोजन केल्यानंतर सरकारतर्फे प्रत्येकी २५,००० रुपये दोन्ही मुलींच्या नावाने बँकेत जमा केले जातील.‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ अंतर्गत, महाराष्ट्रातील दोन मुली असलेल्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळेल. तसेच, गरीबी रेषेखाली (BPL) येणाऱ्या आणि वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपर्यंत असलेल्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.सरकारच्या नवीन निर्णयानुसार, या योजनेत लाभ मिळवण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ७.५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय, मुलीच्या जन्मापासून ते ती १८ वर्षांची होईपर्यंत अधिक फायदे मिळण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजने चे लाभ

  • माझी कन्या भाग्यश्री योजना चा लाभ महाराष्ट्र राज्यातील एका कुटुंबात जर दोन मुली जन्माला आल्या असतील तर त्या दोन मुलींना दिला जाईल.
  • या योजने अंतर्गत मुलगी आणि तिच्या आईच्या नावावर नॅशनल बँक मध्ये जॉईन अकाउंट काढून दिले जातील आणि त्याच बरोबर १ लाख रुपयांचा एक्सीडेंट कवर आणि पाच हजार रुपयांची ओवरड्राफ्ट ची सुविधा सुद्धा दिली जाईल.
  • योजने अंतर्गत जर कोणत्याही कुटुंबात पहिली मुलीचा जन्म होतो आणि त्या मुलीचे आई-वडील एका वर्षाच्या आत नसबंदी करून घेतली तर त्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळेल.
  • जर एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी आहे आणि दुसरी मुलगी जन्माला आली तर अशा परिस्थितीत पती-पत्नीने ६ महिन्यांच्या आत नसबंदी करून घेतल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • जर एखाद्या पती-पत्नीला दोन मुली जन्मल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी कुटुंब नियोजन करून घेतले, तर त्यांना सरकार कडून प्रत्येकी २५,००० रुपयांची मदत दिली जाईल.
  • योजनेच्या तर्फे जे पैसे माता पिताना प्राप्त होता. त्या पैशाचा उपयोग आई वडील त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी करू शकतील.
  • Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा लाभ अशा कुटुंबांना मिळेल ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 7 लाख 50 हजार पर्यंत आहे.
  • या योजनेचा लाभ अशाच परिवारांना भेटेल जे बी पी एल कॅटेगरीमध्ये येतात आणि ते महाराष्ट्राचे स्थायी निवासी आहेत.

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजने ची पात्रता

  • Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजने चा अर्जदार हा महाराष्ट्रातील स्थायी निवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा मुख्यता लाभ हा महाराष्ट्र राज्यातील एक कुटुंबातील दोन मुलींना दिला जाईल.
  • तुमचे वार्षिक उत्पन्न हे 7 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • गरीब वर्गातील नागरिक आणि बीपीएल (BPL) श्रेणीतील कुटुंबे देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया करते वेळेस मुलीच्या जन्मांची नोंदणी प्रमाणपत्र हे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय हे 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि ती दहावी मध्ये पास असली पाहिजे व ती मुलगी 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत अविवाहित राहणे आवश्यक आहे.
  • जर दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळी जुळ्या मुलींचा जन्म झाला, तर त्या दोन्ही मुली टाइप-२ नुसार योजनेसाठी पात्र ठरतील.

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • माता किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
  • राहिवास प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड (बीपीएल श्रेणीसाठी आवश्यक)
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजने ची अँप्लाय प्रोसेस

  • योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम व्यक्तीला महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर जावे लागेल.
  • अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर गेल्यानंतर वर दिसणाऱ्या सर्च बॉक्सवर क्लिक करा.
  • आता व्यक्तीला इंग्रजी भाषेत “माझी कन्या भाग्यश्री योजना” अर्ज फॉर्म PDF असे लिहून सर्च करावे लागेल आणि शोधणे चालू करावे.
  • शोध पूर्ण झाल्यावर आपल्यासमोर योजनेचा अर्ज फॉर्म PDF स्वरूपात दिसेल.
  • आता आपल्याला PDF फॉर्मवर डबल क्लिक करून तो डाउनलोड करावा लागेल आणि त्याचा प्रिंटआउट घ्यावा लागेल.
  • आता आपल्याला आवश्यक माहिती, जसे की नाव, पत्ता, माता-पित्याचे नाव, मुलीची जन्मतारीख, फोन नंबर इत्यादी प्रिंटआउट फॉर्ममध्ये भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
  • आता अर्ज घेऊन तो जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करा.
  • या प्रकारे वरील दिलेल्या प्रक्रियांचे पालन करून योजना मध्ये अर्ज केला जाऊ शकतो.

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजने चे काही आवश्यक प्रश्न

  • माझी कन्या भाग्यश्री योजना म्हणजे काय ?
  • राज्यात मुलींच्या प्रमाणात सुधारणा आणि महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात लागू केली आहे.
  • माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ काय आहे ?
  • योजने अंतर्गत जर कोणत्याही कुटुंबात पहिली मुलीचा जन्म होतो आणि त्या मुलीचे आई-वडील एका वर्षाच्या आत नसबंदी करून घेतली तर त्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळेल.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Pradhan Mantri Free Shauchalay Yojana 2025 | प्रधान मंत्री फ्री शौचालय योजना | सरकारकडून येणार शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत

Maharashtra Vidhva Pension Yojana 2025| महाराष्ट्र विधवा पेंशन योजना | आता विधवा महिलांना मिळणार दर महिन्याला 600 ते 900 रुपयांची आर्थिक मदत

Pradhan Mantri Atal Pension Yojana 2025 | प्रधान मंत्री अटल पेन्शन योजना | 60 वर्षानंतर न मिळेल दर महिन्याला 5000 रुपयांची पेन्शन