Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना : देशातील शेतकऱ्यांना लाभ पोहोचण्यासाठी प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना शेती च्या सिंचनासाठी लागणारी उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत म्हणून आर्थिक सहाय्यता प्रदान केली गेली आहे. योजनेच्या अंतर्गत पाण्याची बचत, कमी मेहनत आणि इतर प्रकारच्या कामांसाठी योग्य प्रकारे बचत मिळू शकेल.

यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या सिंचनात कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना नाही करावा लागेल. तुम्ही पण या योजनेचा लाभ घेणार असाल, तर या आर्टिकल ला तुम्हाला काळजीपूर्वक पूर्ण वाचायला हवे या आर्टिकल मध्ये प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना साठी लागणारी सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे जसे की ऑनलाईन फॉर्म कसा भरावा, या योजनेचे उद्देश पात्र काय आहे या सर्वांची माहिती या आर्टिका मध्ये दिली आहेत तरी तुम्ही या आर्टिकलना पूर्ण वाचावे.
योजनेचे नाव | Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
योजना कधी सुरू झाली | 1 जुलै 2015 |
योजनेचे उद्देश | वाढत्या पाणी टंचाईचा विचार करून अतिशय कमीत कमी पाण्यामध्ये उपयुक्त शेती करणे हे प्रमुख उद्दिष्टे आपल्या केंद्र सरकारचे या योजनेमार्फत आहे. |
लाभार्थी | देशातील शेतकरी |
देश किंवा राज्य | भारत |
आर्थिक मदत | शेतीच्या सिंचनासाठी आर्थिक मदत भेटणार आहे |
योजनेची वेबसाईट | P M Krushi Sinchan Yojana |
Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना म्हणजे काय?
शेतातील कोणत्याही प्रकारची पिके चांगल्या प्रकारे उगवण्यासाठी शेतीचे सिंचन चांगल्या प्रकारे केली पाहिजे. शेतामध्ये पीक लागवडी दरम्यान जास्त प्रमाणात सिंचन करणे आवश्यक असते. जर पिकांना चांगल्या प्रकारे पाणी नाही भेटले तर ते पीक चांगल्या प्रकारे उगवत नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान होते. प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना च्या अंतर्गत या समस्या दूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पाण्याची अवस्था केली जाईल.
योजने अंतर्गत स्वयं सहाय्यता गट ( self help groups ), ट्रस्ट ( trust), सरकारी संस्था ( cooperative society ), इको पोर्टेड कंपनी (eco-ported company ), उत्पादक ( producer) शेतकऱ्यांच्या गटांचे सदस्य आणि इतर मान्यताप्राप्त संस्थांचे सदस्य यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार द्वारे या Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना (pmksy ) मध्ये 50 करोड रुपया ची रक्कम सर तरतूद केली आहे.
Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजने चे लाभ
- या योजने अंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना या शेतात पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध करून देणे सिंचनासाठी लागणाऱ्या साधनसामग्री साठी सरकारकडून त्यांना आवश्यक तेवढे अनुदान (सबसिडी ) देण्यात येईल.
- शेतात होणाऱ्या पाण्याच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी पीएम कृषी सिंचन योजना ची सुरुवात केली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी पिकांना देण्यासाठी सुविधा प्राप्त होईल.
- शेती युक्त योग्य जमिनीला या योजनेचा लाभ प्राप्त होईल.
- योजनेचा लाभ केवळ अशा शेतकऱ्यांना होईल, ज्यांच्याकडे शेती योग्य जमीन तथा जल स्तोत्र आहे.
- प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना मुळे शेतीचे विस्तार होईल. आणि उत्पादनामध्ये पण वाढ होईल व अर्थव्यवस्था चा विकास होईल.
- योजनेमुळे होणारा खर्च हा केंद्र सरकार द्वारे 75% आणि राज्य सरकार द्वारे 25% उचलती.
- यामुळे शेतकऱ्यांना ड्रिप/स्प्रिंकलरसारख्या सिंचन योजनांचा देखील लाभ मिळेल.
- नवीन उपकरणाच्या वापरण्यामुळे 40 -50 टक्के पाण्याची बचत होईल आणि त्याचबरोबर 35-40 टक्के शेती उत्पादनात वाढ आणि उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये सुद्धा वाढ होईल.
Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजने चे उद्देश
- क्षेत्रीय स्तरावर सिंचनामध्ये गुंतवणुकीचे अभिसरण साध्य करणे (जिल्हा स्तरावर आणि गरज भासल्यास उप-जिल्हा स्तरावर पाणी वापर योजना तयार करणे).
- शेतीसाठी पाण्याचा शारीरिक पोहोच वाढवणे आणि निश्चित सिंचन (प्रत्येक शेताला पाणी) अंतर्गत शेतीयोग्य क्षेत्राचा विस्तार करणे.
- जलस्रोत, वितरण आणि त्याचा कार्यक्षम वापर एकत्र करणे, जेणेकरून योग्य तंत्रज्ञान आणि पद्धतींच्या माध्यमातून पाण्याचा सर्वोत्तम वापर सुनिश्चित करता येईल.
- शेतीत पाणी वापरण्याची कार्यक्षमता सुधारून पाण्याचा अपव्यय कमी करणे तसेच कालावधी आणि मर्यादा यामध्ये उपलब्धता वाढवणे.
- अचूक सिंचन व पाणी बचत करणाऱ्या अन्य तंत्रज्ञानांचा (थेंब-थेंब अधिक पीक) स्वीकार वाढवणे.
- जलभरांच्या पुनर्भरणाला चालना देणे आणि शाश्वत जलसंधारण पद्धती स्वीकारणे.
- मृदा आणि जलसंधारण, भूजल पुनर्जनन, पाण्याचा अपवाह रोखणे, उपजीविकेचे पर्याय उपलब्ध करून देणे आणि इतर नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (NRM) उपक्रमांसाठी वॉटरशेड दृष्टिकोन वापरून पावसावर आधारित क्षेत्रांचा समन्वित विकास सुनिश्चित करणे.
- शेतकरी व स्थानिक क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि पीक पद्धतींसंबंधी विस्तार कार्य वाढवणे.
- शहरी शेतीसाठी शुद्ध केलेल्या नगरपालिकेच्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची व्यवहार्यता शोधणे.
Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजने ची पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
- देशातील सर्व जातीचे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- योजनेच्या अंतर्गत सेल्फ हेल्प ग्रुप( self help groups ), ट्रस्ट ( trust), सरकारी संस्था, इको पोर्टेड कंपनी, उत्पादक ) शेतकऱ्यांच्या गटांचे सदस्य आणि इतर मान्यताप्राप्त संस्थांचे सदस्य यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- तो शेतकरी जो किमान सात वर्षांपासून पट्ट्याने घेतलेल्या जमिनीवर शेती करत आहे, तो या पात्रतेसाठी योग्य मानला जाईल. याशिवाय, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून देखील ही पात्रता प्राप्त करता येऊ शकते.
- अर्ज करणारा भारताचा मूळ रहिवाशी असावा लागेल.राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- लाभार्थ्याला केवळ BIS मार्क असलेली प्रणाली विकत घेणे आवश्यक आहे, त्यानंतरच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजनेअंतर्गत सबसिडी फक्त ५ हेक्टर पेक्षा कमी जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना दिली जाईल.
Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- जमिनीचे कागदपत्र (जमीनाची जमा बंदी (शेताची नकल) भूस्वामित्व प्रमाणपत्र (अर्जानुसार) )
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- चालू मोबाईल नंबर
Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना ची अप्लाय प्रोसेस
ऑफलाइन अप्लाय प्रोसेस
- Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजने चा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ब्लॉक किंवा जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क करावा लागेल.
- यानंतर तुम्हाला संबंधित प्राधिकाऱ्याशी सपंर्क करून या योजने चा फॉर्म प्राप्त करा.
- याच्या नंतर या फॉर्म मध्ये मागितलेली सर्व माहिती काळजी पूर्वक भरावी.
- अर्जा मध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लावावा लागेल आणि तुमचे सही करायची आहे.
- या नंतर तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्राचे झेरॉक्स काढून फ्रॉम ला लावावा.
- या नंतर तुम्हाला अर्जाला तुम्हाला ब्लॉक किंवा जिल्हा कृषि कार्यालय च्या संबंधित अधिकाऱ्यांन कडे जमा करावा.
- या प्रकारे प्रधान मंत्री कृषि संचिन योजना मध्ये अर्ज करा आणि याचा लाभ घ्या.
ऑनलाइन अप्लाय प्रोसेस
- योजनेशी संबंधित माहिती प्राप्त करण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी याची अधिकृत वेबसाइट http://pmksy.gov.in/ स्थापित केली आहे. या वेबसाइटवर योजनेसंबंधी सर्व माहिती विस्तारपूर्वक दिली आहे. इच्छुक अर्जदार प्रदेश कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही योजनेसंबंधी माहिती प्राप्त करू शकतात आणि अर्ज करू शकतात.
- आता “हर खेत को पानी” या पर्यायावर क्लिक करा.
- येथे दिलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
- जर तुम्हाला थेट अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या माहितीचा वापर करून अर्ज करू शकता.
Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना चे काही आवश्यक प्रश्न
- Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना काय आहे?
- Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनाजल व्यवस्थापन आणि सिंचन कार्यक्षमतेवर केंद्रित एक सरकारी योजना आहे.
- Pradhan Mantri krushi Sinchan Yojana 2025|प्रधान मंत्री कृषी सिंचन योजने साठी कोण कोण पात्र आहेत?
- भारताच्या सर्व राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील सर्व शेतकरी PMKSY लाभासाठी पात्र आहेत.लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना ५५% सहाय्यता मिळते, तर इतर शेतकऱ्यांना ४५% सहाय्यता मिळते.सबसिडी कमाल ५ हेक्टर पर्यंत मर्यादित आहे.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website
Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना फ्री रेशन